ऑनलाईन टीम / मुंबई :
छोट्या पडद्यावरील अभिनेता पर्ल वी पुरी याला शुक्रवारी रात्री उशीरा पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर बलात्कार आणि छेड काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एका महिलेने पर्लवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. सदर मुलीने आणि तिच्या कुटुंबियांनी पर्ल विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पर्ल याला शुक्रवारी रात्री उशीरा अटक केली. सध्या पर्ल पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, ही मुलगी अल्पवयीन असल्याने पर्लविरोधात पोस्को कायद्यांतर्गंत कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पर्ल वी पुरीसह मुंबई पोलिसांनी 6 जणांवर पोलिसांनी बलात्काराचा आरोप केला आहे. पिडीत मुलीने आपल्या जबाबामध्ये म्हटले आहे की, सर्व आरोपींनी तिच्यावर गाडीमध्ये बलात्कार केला आणि त्यानंतर अनेकदा त्यांनी हे कृत्य तिच्यासोबत केले.
अभिनेता पर्ल वी पुरी अभिनेत्री करिश्मा तन्नासोबत रिलेशनमध्ये असल्याची चर्चा होती. मागील दोन वर्षे ते रिलेशनमध्ये होते परंतु नंतर त्या दोघांमध्ये वाद झाल्याने ते वेगळे झाले. परंतु ते आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
पर्ल 2013 पासून अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असून ‘दिल की नजर से’ ही त्याची पहिली मालिका होती. नायक म्हणून त्याने पहिल्यांदा ‘फिर भी ना माने बदतमीज दिल’ या मालिकेत काम केले. त्यानंतर पर्लने ‘नागार्जुन एक योद्धा’, ‘बेपनाह प्यार’, ‘नागिन 3’ आणि ‘ब्रह्मराक्षस 2’ या मालिकांमध्ये काम केले. पर्लने बिग बॉस 12 आणि 13 कार्यक्रमात पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. त्याशिवाय ‘किचन चॅम्पियन 5’ आणि ‘खतरा खतरा’ सारख्या रिॲलिटी कार्यक्रमातही तो सहभागी झाला होता. त्याने काही म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे.