डेंटल सर्जन तुषान भिंडीसोबत विवाहबद्ध
अभिनेत्री एवलिन शर्माने ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाचे डेंटल सर्जन डॉ. तुषान भिंडी याच्याशी विवाह केला आहे. 15 मे रोजी ब्रिस्बेन येथे हा विवाह सोहळा पार पडला आहे. एवलिनने स्वतःच्या विवाहाची काही छायाचित्रे सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहेत.
स्वतःच्या चांगल्या मित्रासोबत विवाह हा जीवनातील सर्वोत्तम अनुभव आहे. आम्ही एकत्र जीवन व्यतित करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत असे एवलिनने म्हटले आहे. दोघांचाही साखरपुडा दीड वर्षापूर्वीच झाला होता. तेव्हापासून विवाहाचे प्लॅनिंग सुरू होते. पण लॉकडाउनमुळे हे प्लॅनिंग वाया गेले असल्याचे तुषानने सांगितले आहे.
एवलिनची आई देखील या विवाह सोहळय़ात सामील होऊ शकलेली नाही. भविष्यात आम्ही एक मोठे वेडिंग रिसेप्शन देणार आहोत. तेव्हा कुटुंबीय आणि मित्रांसोबत विवाहाचा आनंद साजरा करू. सद्यस्थितीत आमची मातृभूमी भारतासाठी प्रार्थना करत आहोत, असे एवलिन आणि तुषान यांनी म्हटले आहे.
एवलिनने 2021 मध्ये प्रदर्शित ‘फ्रॉम सिडनी विद लव’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर ‘हे जवानी है दिवानी’, ‘मैं तेरा हीरो’, ‘जबर हॅरी मेट सेजल’, ‘नौटंकी साला’, ‘हिंदी मीडियम’ चित्रपटात ती दिसुन आली होती.