अकोला : अकोला जिल्ह्यात पोहचलेल्या भारत जोडो यात्रे मध्ये चित्रपट अभिनेत्री रिया सेन हिने हजेरी लावली. पुजा भट्टनंतर बॉलिवूडमधून भारत जोडो यात्रेमध्ये चालणारी ती दुसरी अभिनेत्री ठरली आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात आहे. अभिनेत्री रिया सेन हिने सुध्दा या यात्रेमध्ये उपस्थिती दाखवली. ती खासदार राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेमध्ये काही काळ चालत गेली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिनेत्री रिया सेनला गर्दीपासून सुरक्षा पुरवली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलने सेन यांच्या राहूल गांधींसोबतच्य़ा क्षणचित्रांची मालिका शेअर करून “अभिनेत्री रिया सेन #BharatJodoYatra मध्ये सामील झाली आहे. हे या रस्ते क्रांतीचे साक्षीदार आहेत,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे. यापुर्वी 90 च्या दशकातील प्रसिध्द अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्ट हि सुद्धा हैदराबादमधील यात्रेत सहभागी झाली
“झंकार बीट्स” आणि “स्टाईल” सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या सेननेही “फक्त चित्रपटसृष्टीतीलच नाही तर एक अभिमानी नागरिक म्हणूनही या व्यासपीठाचा भाग बनल्याचा आनंद आहे!” असे म्हटले आहे. यापुर्वी तिले केलेल्या पोस्टमध्ये भारत जोडो यात्रेचे वर्णन “एकतेचा शो” असे केले होते.