बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मादक पदार्थांची तस्करी आणि अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत कोणाचे रक्षण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी झालेल्या संभाषणावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
मुख्यमंत्र्यांनी तरुण व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असलेल्या या धंद्याविरूद्ध कठोर पावले उचलली जात असल्याचे म्हंटले.
गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी मादक पदार्थांच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि त्यांनी पोलीस महासंचालकांना संयुक्तपणे ड्रग्सविरूद्ध शेजारील राज्यांसह संयुक्त तपास चालविण्याचे निर्देश दिले आहेत.
सोमवारी पोलिसांनी बारा अमली पदार्थ तस्करांना अटक केली आणि ८५ लाखाहून अधिक किमतीची ड्रग्ज जप्त केली.
दरम्यान, कन्नड चित्रपटसृष्टीत ड्रग रॅकेट प्रकरणी सीसीबीच्या वतीने अटक केलेल्या कन्नड चित्रपट अभिनेत्री रागिनी द्विवेदी (वय 30) यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सीसीबीच्या विनंतीवरून कोर्टाने अभिनेत्रीला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. तर आज पोलिसांनी अभिनेत्री संजना हिच्या घराची झडती घेत चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.