हैदराबाद
हैदराबाद येथील अमारा राजा या कंपनीने येत्या पाच ते सात वर्षांमध्ये जवळपास 1 अब्ज डॉलर्स (साधारणतः 7 हजार 400 कोटी रुपये) ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. ही कंपनी विविध प्रकारच्या बॅटरींचे उत्पादन करते. या गुंतवणुकीचा व्यय कंपनी नवी अधिग्रहणे आणि नव्या प्रकल्पांच्या निर्मितीसाठी करणार आहे. कंपनी सध्या लीड-ऍसिड बॅटऱयांचे उत्पादन करते. मात्र या बॅटऱयांची मागणी आता कमी झाल्याने नव्या पद्धतीच्या लिथियम आयॉन बॅटऱयांच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. केंद्र सरकारनेही लिथियम आयॉन बॅटऱयांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात या बॅटऱयांना ज्या प्रमाणात मागणी असेल त्या प्रमाणात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यात येईल. ही माहिती कंपनीच्या अधिकाऱयांनी काही ज्येष्ट अधिकाऱयांनी दिली आहे.