ऑनलाईन टीम / जिनेवा :
अमेरिकन कवयित्री लुईस ग्लुक यांना 2020 सालचा साहित्य नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
नोबेल पुरस्कार समितीने सांगितले की, लुईस यांना त्यांच्या अद्वितीय काव्य रचनेसाठी हा पुरस्कार दिला जात आहे. त्यांचा आवाज सुंदर आहेच त्यासोबतच त्या बहुश्रुत देखील आहेत.
लुईस यांना 1993 मध्ये साहित्य विभागात पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 77 वर्षीय लुईस ग्लुक या येल विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक होत्या. त्यांना अमेरिकेत साहित्यातील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लुईस ग्लुक यांनी 1968 मध्ये फर्स्टबोर्न ने सुरुवात केली होती. त्यानंतर लगेचच त्या अमेरिकन समकालीन साहित्यातील प्रमुख कवयित्री म्हणून प्रसिद्ध झाल्या. त्यांनी 12 कविता संग्रह आणि निबंध प्रकाशित केले आहेत.