डय़ुसेलडॉर्फ (जर्मनी) / वृत्तसंस्था
अमेरिकन धावपटू ख्रिस्तियन कोलमनला उत्तेजक चाचणीला हजर न राहिल्याबद्दल निलंबित केले गेले. ऍथलेटिक्सच्या सर्वोच्च संघटनेने बुधवारी ही घोषणा केली. विश्व ऍथलेटिक्स उत्तेजक प्रतिबंधक नियमांप्रमाणे किंवा शिस्तपालन तरतुदीनुसार जोवर सुनावणी पूर्ण होत नाही, तोवर कोलमनवरील निलंबन कायम राहील. या तात्पुरत्या निलंबनामुळे तूर्तास कोलमन कोणत्याही शर्यतीत भाग घेऊ शकणार नाही.
कोलमनने गतवर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेपूर्वी आपल्या ठावठिकाणाची माहिती दिली नव्हती. त्याच स्पर्धेत टोकियो ऑलिम्पिकच्या उंबरठय़ावर 100 मीटर्समधील सुवर्णपदकासाठी तो फेवरीटही होता. कोव्हिड-19 मुळे ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर टाकली गेली आहे.
उत्तेजक चाचणी घेणाऱया पथकाला दि. 9 डिसेंबर रोजी मी सापडलो नाही. ख्रिसमससाठी भेटवस्तू घेण्याकरिता मी जवळच्या मॉलमध्ये होतो, असा दावा कोलमनने ट्वीटरवर केला. अर्थात एका वर्षाच्या कालावधीत त्याने चाचणीसाठी उपलब्ध न राहण्याची ही एका वर्षातील तिसरी वेळ होती. उत्तेजक पथकातील अधिकाऱयाचा फोन का रिसिव्ह केला नाही, या प्रश्नावर त्याने यापूर्वी त्यांचे अनेक फोन रिसिव्ह केले आहेत, असे उत्तर दिले.
ऍथलिटनी कोणत्याही दिवसातील किमान एक तास आपण कुठे उपलब्ध असू, याची लेखी माहिती उत्तेजक प्रतिबंधक समितीकडे देणे आवश्यक असते. पण, नियोजित वेळेत चाचणी न दिल्यानंतर तब्बल सहा महिने आपण सदर समितीकडे नमुने घेण्याची विनंती केली, असा कोलमनचा दावा आहे.