ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिका एच-1 बी व्हिसा क्षेत्रात मध्यम आणि उच्च कौशल्य प्रशिक्षणासाठी 15 कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. अमेरिकेच्या कामगार मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
अमेरिकेत काम करणाऱ्या विदेशी कर्मचाऱ्यांचे कौशल्य अद्ययावत करणे. तसेच नव्या पिढिला हे कौशल्य अवगत व्हावे, यासाठी अमेरिका एच-1 बी व्हिसा क्षेत्रात प्रशिक्षणासाठी गुंतवणूक करणार आहे. एच-1 बी व्हिसाच्या मदतीने लाखो विदेशी कर्मचारी अमेरिकेत काम करतात.
अमेरिकेत उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, मीडिया यासारख्या विविध क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अमेरिकेतील वास्तव्याचा कालावधी वाढवून देण्याचा निर्णय प्रस्तावाधीन आहे.