ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या संभाव्य मंत्रीमंडळात संरक्षण मंत्रिपदाची जनरल (निवृत्त) लॉयड ऑस्टीन यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. ते अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय संरक्षण मंत्री असतील.
ऑस्टीन यांनी पेंटागॉनमध्ये संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडमधून 2016 मध्ये ते निवृत्त झाले. युद्धभूमीवर त्यांनी यशस्वी कामगिरी केल्यामुळे ते संरक्षण मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार होते.
ऑस्टिन यांनी बायडेन उपराष्ट्रपती असतानाही त्यांच्यासोबत काम केले आहे. ऑस्टिन विश्वासास पात्र असल्यामुळेच त्यांना बायडेन पुन्हा संधी देत असल्याची चर्चा आहे.