वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
कोरोना महामारीला तोंड देण्याकरता आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी अमेरिकेने भारताला 4.1 कोटी डॉलर्सचा मदतनिधी देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने आतापर्यंत भारताला याप्रकरणी 20 कोटी डॉलर्सची मदत केली आहे.
भारताच्या गरजा पाहता अमेरिका मदतीसाठी सरसावला आहे. कोरोनाविरोधी लढय़ात अमेरिका आता भारतीयांसोबत उभा आहे. मदतनिधीमुळे भारताची कोरोनाविरोधी तयारी अधिक सशक्त होईल. संकट वाढल्यास त्याला सामोरे जाण्यास मदत मिळणार असल्याचे उद्गार आंतरराष्ट्रीय विकाससंबंधी अमेरिकेन यंत्रणेने (युएसएआयडी) काढले आहेत.
या अतिरिक्त मदतनिधीसह युएसएआयडी आरोग्य सेवा क्षेत्रात मदतीसह इलेक्ट्रॉनिक आरोग्य माहिती प्राणली, लसीकरणाच्या प्रयत्नांमध्ये सहकार्य आणि खासगी क्षेत्राद्वारे मदतसामग्री पोहोचविणार आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान अमेरिकेने भारताला भरीव मदत केली आहे.