घेतली नव्हती लस
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू ओढवला आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनने आतापर्यंत 12 बळी घेतले आहेत. संक्रमणाच्या अन्य स्वरुपांच्या तुलनेत ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असून अमेरिकेत मागील आठवडय़ात संक्रमणाचे 73 टक्के नवे रुग्ण ओमिक्रॉनचे असल्याचे सीडीसीने म्हटले आहे.
अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात 50 वर्षांच्या आसपास वय असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीने लसीचे डोस घेतले नव्हते, पण यापूर्वी देखील त्याला कोरोनाची लागण झाली होती. लस न घेतल्याने आणि प्रकृती अस्वास्थामुळे या व्यक्तीचे कोरोना संक्रमण गंभीर स्वरुप घेण्याचा अत्याधिक होता.