ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने नुकतीच हायब्रीड ग्राऊंड-फ्लाईंग व्हेईकलला मंजुरी दिली.
अमेरिकेत असलेली ही दोन सीटर हायब्रीड कार अवकाशात आणि रस्त्यावरही चालवता येते. मात्र, सध्या या कारच्या केवळ उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली आहे. रस्ते सुरक्षा मानांकनाचे प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे ही कार रस्त्यावर धावण्यास अजून एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.
या फ्लाईंग कारसाठी हायब्रीड-इलेक्ट्रिक मोटारचा वापर करण्यात आला आहे. ही कार हवेत ताशी 161 किमी वेगाने उड्डाण करते. तसेच उड्डाण केल्यावर ही कार अंदाजे 644 किलोमीटरचे अंतर कापू शकते. कारला फिक्स्ड लँडिंग गिअर देण्यात आले आहेत.