ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत मागील 24 तासात 2600 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबळींची संख्या वाढत असल्याने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशही आता कोरोनापुढे हतबल झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिका मात्र, अद्यापही कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 6 लाख 44 हजार 348 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 28 हजार 554 जणांचा मृत्यू झाला आहे. 48 हजार 708 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही अमेरिकेत 5 लाख 67 हजार 086 ॲक्टिव केसेस आहेत. त्यामधील 13 हजार 487 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेपाठोपाठ इटलीमध्ये मृतांची संख्या सर्वाधिक आहे. इटलीत 21 हजार 645 जणांचा तर स्पेनमध्ये 18 हजार 812 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.