ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत मागील 24 तासात 60 हजार 209 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 1114 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने याबाबतची माहिती दिली आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 30 लाख 97 हजार 087 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 1 लाख 33 हजार 972 जणांचा मृत्यू झाला आहे. 30.97 लाख कोरोना रूग्णांपैकी 13 लाख 54 हजार 863 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 16 लाख 08 हजार 249 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 15 हजार 371 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. दररोज सरासरी 50 हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.