ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत आतापर्यंत 64 लाख 31 हजार 160 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 37 लाख 07 हजार रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत शनिवारी 42 हजार 095 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 707 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या अमेरिकेत 25 लाख 31 हजार 340 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 14 हजार 942 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 1 लाख 92 हजार 820 जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्राझीलमध्ये 32.96 लाख कोरोनामुक्त
ब्राझीलमध्ये 41 लाख 23 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 32 लाख 96 हजार 702 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अजूनही 7 लाख 68 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 1 लाख 26 हजार 230 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.