ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोना लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल निर्यात करण्यास अमेरिकेने भारताला नकार दिला आहे.
अमेरिकेने कोरोना लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल देशाबाहेर न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारतात लसीसाठीच्या कच्च्या मालाचा तुटवडा असल्याने सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडीयाने कच्चा माल भारताला द्यावा, अशी विनंती दोन वेळा व्हाईट हाऊसशी संपर्क साधून केली होती.
अमेरिकेने यावर आतापर्यंत कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. अखेर आज अमेरिकेने भारताला उत्तर दिले आहे. कच्च्या मालाची निर्यात बंदी उठवण्यावर स्पष्ट नकार देत अमेरिकेने म्हटले आहे की, ‘आमचे प्राधान्य अमेरिकन नागरिकांना आहे. आमचे नागरिक हीच आमची जबाबदारी आहे.’
अमेरिकेचे हे उत्तर ऐकून भारताच्या उपकारांचा त्यांना विसर पडल्याचे दिसून येते. कोरोना उपचारात वापरण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरीक्वीनच्या कोट्यवधी गोळ्या मानवतेच्या भावनेतून भारताने अमेरिकेला दिल्या होत्या.