कुंभोज / वार्ताहर
कुंभोज ता हातकणंगले येथील वारणा दूध संघाचे संचालक माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण रावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज दैनिक तरुण भारतने प्रकाशित केलेल्या वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन माजी आमदार व जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते अरुण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दैनिक तरुण भारतने प्रकाशित केलेली वाढदिवस विशेषांक उल्लेखनीय असून आज दैनिक तरुण भारतने शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांना आपल्या दैनिकाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आणण्याचे काम केले आहे. परिणामी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात दैनिक तरुण भारतची भूमिका सतत महत्त्वाची ठरत आली आहे. असे गौरवोद्गार माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दैनिक तरुण भारत प्रतिनिधी पत्रकार विनोद शिंगे यांच्याशी बोलताना काढले.
यावेळी आमदार विनयरावजी कोरे, आमदार प्रकाश आवाडे ,माजी आमदार अमल महाडिक, आमदार राजू बाबा आवळे, माजी आमदार राजू किसन आवळे, खासदार धैयशिल माने, माजी खासदार राजू शेट्टी तसेच शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध संस्था, तरुण मंडळे, ग्रामपंचायत कुंभोज, जनसुराज्य, शिवसेना, काँग्रेस, भाजप ,राष्ट्रवादी आदी पक्षांच्यावतीने अरुण पाटील यांचा सत्कार करण्यात आला.