वृत्तसंस्था/ मुंबई
भारताचा धावपटू अरुणकुमार भारद्वाज हा पहिला भारतीय ‘अल्ट्रा मॅरेथॉन रनर’ ठरला आहे. नुकत्याच झालेल्या मुंबई-नाशिक-पुणे-मुंबई ही मॅरेथॉन त्याने यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
31 जानेवारी रोजी 560 कि.मी. पल्ल्याची ही अल्ट्रा मॅरेथॉन घेण्यात आली होती. ही मॅरेथॉन तीन प्रमुख शहरामध्ये झाली. अरूणकुमार भारद्वाजने ही मॅरेथॉन 166 तासांत पूर्ण केली. अरूण भारद्वाजने यापूर्वी अनेक दीर्घ पल्ल्याच्या मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्या आहेत. धावपटू अरूणकुमार हा दिल्लीचा रहिवासी आहे. त्याने यापूर्वी कारगिल ते कन्याकुमारी हे 41000 कि.मी. अंतर दोन महिन्यांच्या कालावधीत पार केले होते.