ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांसमवेत व्हर्च्यूअल बैठक घेणार आहेत. दुपारी 3 वाजता ही बैठक होणार असून, बैठकीत आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी खासगी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या मानकांवर तसेच परदेशी गुंतवणूकीवर चर्चा केली जाईल. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत कराड यांच्यासह केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचे सचिव, राज्यांचे मुख्य सचिव आणि वित्त सचिवही उपस्थित असतील.