प्रतिनिधी/ सातारा
कोरोना संसर्ग कालावधीत लॉकडाऊनमध्ये सातारा जिल्हय़ात सर्व प्रकारच्या गुन्हय़ांचा आलेख अगदी शुन्यावर येवून ठेपला होता. मात्र, अनलॉक सुरु झाल्यावर गुन्हय़ांचा आलेख पुन्हा उंचावू लागला आहे. यामध्ये अश्लिल व्हिडिओ दाखवून महिला, युवतींवर अत्याचाराचा घटना वाढू लागल्या आहेत. साताऱयातील एका अल्पवयीन मुलीशी आंतरजातीय विवाह करुन तिच्यावर अत्याचार करुन त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
एका पेठेत राहणाऱया अल्पवयीन मुलीला आंतरजातीय विवाह केल्यावर सरकारकडून तीन लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. नंतर अत्याचार करताना काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱया प्रिन्स भगत, विजया भगत, आलिशा भगत व प्रिन्स याच्या दोन मावशा (नावे माहिती नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पिडीत युवतीने याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या गुन्हय़ातील संशयित प्रिन्स भगत याने पीडित युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केल्यास सरकारकडून तीन लाख रुपयांचे अनुदान मिळेल असे आमिष दाखवले. त्यांतर त्याने तिच्यासोबत लग्नग्न करुन तिला दारू पाजून तिच्यावर अत्याचार केले. तसेच तिच्यासोबतचे काही अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. असे कृत्य करण्यासाठी त्याला इतर विजया भगत, आलिशा भगत व प्रिन्स याच्या दोन मावशा या संशयितांनी मदत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. के. माने करत आहेत.