प्रतिनिधी/ बेळगाव
हिरेकोप्प (ता. रामदुर्ग) येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. मंगळवारी यासंबंधी मुरगोड पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पीडित 15 वषीय बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यासंबंधी मेळ्ळीकेरी (ता. रामदुर्ग) येथील परमानंद नामक तरुणावर भा.दं.वि. 366(ए), 376(2) व पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी परमानंदला ताब्यात घेतले असून त्यालाही वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लग्नाचे आमिष दाखवून या 15 वषीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगण्यात आले. मुरगोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.