तरुणाला अटक, काकती पोलिसांची कारवाई
@ प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुक्मयातील पश्चिम भागातील एका गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून काकती पोलिसांनी शुक्रवारी त्या मुलीच्या मामाला अटक केली आहे. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.
15 वषीय मुलीवर सतत बलात्कार करण्यात आला असून या संबंधी काकती पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱयांनी त्या मुलीच्या मामाला अटक केली आहे.
आईच्या निधनानंतर आजोळी आलेल्या 15 वषीय अल्पवयीन मुलीवर वेगवेगळी आमिषे दाखवून तिच्या मामानेच बलात्कार केला आहे. तिने आपल्या कुटुंबीयांना ही गोष्ट सांगितली. मात्र, त्यांनी प्रकरण झाकून ठेवले. आता हे प्रकरण उघडकीस आले असून वैद्यकीय तपासणीनंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात येणार आहे.