10 वर्ष सक्तमजुरी, 20 हजाराचा दंड देवरुख येथील घटना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
संगमेश्वर तालुक्यातील 17 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शरीरसंबध प्रस्थापित करणाऱया तरुणाला न्यायालयाने शिक्षा ठोठावल़ी 10 वर्ष सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंड असे शिक्षेचे स्वरुप आह़े याप्रकरणी पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याचा आरोप असलेल्या अन्य एका तरुणाला न्यायालयाने निर्दोष मुक्त केल़े
सौरभ सुनील पागार (23, पाटगांव देवरुख) असे नाव शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे तर पुरावा नष्ट केल्याचा आरोप असलेल्या वेलाराम उर्फ विकी दलाराम देवासी (23, संगमेश्वर) असे निर्दोष मुक्तता केलेल्या तरुणाचे नाव आह़े अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधिश व्ह़ी ए़ राऊत यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा सरकारी पक्षातर्फे ऍड़ मेघना नलावडे यांनी काम पाहिल़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सौरभ व पीडित मुलगी यांच्यात मैत्रीचे संबंध होत़े सौरभने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून 4 जानेवारी ते 5 एप्रिल 2019 दरम्यान विविध ठिकाणी तिच्याशी जबदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल़े पीडित मुलीला गर्भधारणा झाल़ी यानंतर सौरभने पीडितेवर गर्भापात करण्यासाठी दबाव टाकल़ा
गर्भपातासाठी सौरभने वेलाराम उर्फ विकी देवासी याची मदत घेतल़ी वेलाराम याने पीडित मुलीसाठी गर्भपाताच्या गोळ्या सौरभजवळ दिल्याच्या आरोप वेलाराम याच्यावर ठेवण्यात आला होत़ा दरम्यान गोळ्या घेतल्यानंतर पीडीत मुलीला त्रास जाणवू लागल्याने घडला प्रकार नातेवाईकांसमोर उघड झाल़ा त्यानुसार पिडीतेच्या नातेवाईकांनी देवरूख पोलिसांत सौरभ व वेलाराम यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केल़ी
देवरूख पोलीस ठाण्यातील तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांनी या घटनेचा तपास केल़ा आरोपी सौरभ याच्याविरूद्ध भादवि कलम 376 (2)(जे)(एन) व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केल़ा वेलाराम याच्याविरूद्ध पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सहआरोपी करण्यात आल़े दोघांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल़े खटल्यादरम्यान एकूण 15 साक्षीदार सरकारी पक्षातर्फे तपासण्यात आल़े न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून देवरूख पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील रामजी आयरे यांनी काम पाहील़े