पाकिस्तानी टिकटॉक स्टार हारिमकडून थप्पड
पाकिस्तानचे वादग्रस्त मुफ्ती अब्दुल कवी पुन्हा चर्चेत आले आहेत. मुफ्ती अब्दुल कवीने स्वतःच्या मुलीच्या वयाची पाकिस्तानी टिकटॉक स्टार हारिम शाहला उद्देशून अश्लील टिप्पणी केली. यावर संतप्त हारिम शाहने मुफ्तीच्या कानशिलातच लगावली आहे. या प्रकाराची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे.
मुफ्तीला थप्पड लगावल्याचा मला कुठलाच पश्चाताप नाही, त्यांच्यासारख्या व्यक्तीला शिक्षा केल्यास पाकिस्तानात एकही बलात्कार होणार नाही असे हारिमने म्हटले आहे. पाकिस्तानी मुफ्ती यापूर्वी सोशल मीडिया स्टार कंदील बलोचसोबत असलेल्या नातेसंबंधांवरून वादात राहिले होते. कंदील यांची नंतर हत्या करण्यात आली होती. मुफ्ती अब्दुल कवी हे हारिमला शहजादी (राजकन्या) संबोधितात तसेच त्यांनी तिच्यासमोर विवाहाचा प्रस्तावही मांडला होता.