वाढीव बिल दिल्याची हेस्कॉमची माहिती : ग्राहकांनी गोंधळ करून न घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी बेळगाव
पहिल्यांदा कोणत्या व किती महिन्याचे बिल आहे हे तपासा. काहींनी फेब्रुवारीचे मार्च महिन्यात आलेले बिलही न भरल्याने तीन महिन्याचे बिल एकत्रित टाकण्यात आले आहे. तर इतरांचे दोन मार्च व एप्रिल महिन्याचे बिल देण्यात आले आहे. पूर्वीचे रिडिंग आणि आताचे रिडिंग यातील फरक हा सध्याचे रिडिंगमध्ये देण्यात आलेला आहे.
फिक्स चार्जेस या रकाण्यात मंजूर करण्यात आलेल्या किलोवॅटप्रमाणे दर देण्यात आलेला आहे. त्याठिकाणी 2 किलोवॅट करिता 30 युनिट पर्यंतचा दर असा दोन महिन्याचा मिळून 60 युनिट करण्यात आलेला आहे. त्यावरील युनिटला तक्त्यानुसार दर आकारणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये फ्युएल एक्सलेशन चार्जेस (एफएसी) समाविष्ठ करण्यात आलेला आहे. मागील महिन्यात ज्या ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरले आहे, त्यांचे ते बील वजा करून अंतिम बिल देण्यात आलेले आहे.