प्रतिनिधी / कोल्हापूर
हुलहुमले बिच (मालदिव) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॅरा बिच गेम्स-2021 मादळे (ता. पन्हाळा) येथील दिव्यांग खेळाडू नारायण मडके याने उठावदार कामगिरी केली. त्याने भालाफेक स्पर्धेत एफ-54 या पॅटेगिरीत 14.30 मीटर लांब भाला फेकून सुवर्ण पदक पटकावला गवसणी घातली. तसेच थाळी फेक स्पर्धेत 11.90 मीटर थाळी फेकून रौप्य पदक आपल्या नावावर केले. एशियन ट्रक ऍण्ड फेडरेशन ऑफ इंडियाने स्पर्धेचे आयोजन केले होते. नारायणच्या गटातून अकरा देशातील खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.
या सर्वांना भारी पडत त्याने सुवर्ण व रौप्य पदक जिंकले. नारायणला प्रशिक्षक लतिफ शेख, अतुल धनवडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. पदके जिंकून आपल्या मादळे गावी परतल्यानंतर नारायणवर ग्रामस्थांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. तसेच बाबासाहेब मडके, अरुण एकशिंगे, कुंडलिक एकशिंगे व दादासाहेब पाटील यांनी नारायण यांचा सत्कार करुन शब्बासकीची थाप दिली.