ऑनलाईन टीम / लखनऊ :
आंतरराष्ट्रीय भजन गायक अजय पाठकची त्याच्या कुटुंबियांसह धारदार शस्त्राने वार करून पूर हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील शामली येथे पाठक यांच्या राहत्या घरी हे हत्याकांड घडले.
या हत्याकांडात अजय, त्याची पत्नी स्नेहा, मुलगी वसुंधरा व मुलगा भागवत यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाठक कुटुंबीय मंगळवारी सकाळी कर्नाला येथे एका कार्यक्रमासाठी जाणार होते. त्यासाठी त्यांचे दुसरे नातेवाईक त्यांना संपर्क साधत होते. मात्र, त्यांचा फोन लागत नव्हता. त्यांची गाडीही घराबाहेर नसल्याने नातेवाईकांना संशय आला. त्यानंतर त्यांनी घराचे दरवाजे तोडले. तेव्हा पाठक, त्याची पत्नी स्नेहा आणि मुलगी वसुंधराचा मृतदेह आढळला.
दरम्यान, त्यांचा मुलगा भागवत बेपत्ता होता. त्याचा शोध घेत असताना आरोपी हिमांशू याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळ भागवतचा मृतदेह आढळला. तो भागवत आणि पाठक यांची गाडी पेटवून देण्याच्या प्रयत्नात होता.