प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील मुरुड गावाला शासनाकडून लसीकरणाबाबत होणाऱ्या दुजाभावाबाबत मुरुडवासियांनी आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रावर नुकतीच धडक दिली व याचा जाब विचारला. आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्याकडून झालेली चूकही मान्य केली. शिवाय यानंतर मुरुड करिता विशेष लसीकरण शिबिर आयोजित करण्यात येईल असे आश्वासन मुरुड वासियांना दिले.
यावेळी सरपंच सानिका नागवेकर, उपसरपंच सुरेश तुपे, ग्रामपंचायत सदस्य रंजन पुसाळकर, अमित माने, संध्या बाळ, मासुम ऐनरकर ग्रामस्थ विराज खोत, विश्वनाथ वरवडेकर, प्रसाद मुकादम, राजेश शिजवणे, मनोज पवार, अश्रफ ऐनरकर, सरफराज ऐनरकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.