कोल्हापूर प्रतिनिधी
भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी अंबाबाईचे दर्शन (ambabai temple) घेऊन महाराष्ट्र भ्रष्टाचार (corruption) मुक्त करण्याची शक्ती दे आशीर्वाद दे असे साकडे घातले. बारा कोटी जनतेचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या भावनांचा विचार करून महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी हा लढा सुरू आहे, तो यशस्वी करण्यासाठी जनतेचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत आणि निश्चितपणे पूर्ण केला जाईल असे सोमया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान मुरगूडकडे जाण्यासाठी त्यांच्या मार्गाबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे.
कोल्हापुरात किरीट सोमय्या यांचे जल्लोषी स्वागत… पहा व्हिडीओ