मराठी चित्रपट सैराटश्च्या यशानंतर प्रसिद्धी मिळालेला अभिनेता आकाश ठोसर आता आगामी वॉर- एपिक सिरीज 1962 ः दि वॉर इन दि हिल्समध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिरीजमध्घ्ये अभय देओल व सुमीत व्यास यांच्घ्यासह इतर प्रतिष्ठित कलाकार देखील आहेत.
या कलाकारांची नावे लवकरच सांगण्यात येतील. हॉटस्टार स्पेशल्स सिरीज वास्तविक घटनांमधून प्रेरित आहे. ही सिरीज शौर्य व पराक्रमाची ऐकण्घात न आलेली कथा सादर करण्यासोबत कशाप्रकारे 125 भारतीय सैनिक 3000 चीनी सैनिकांविरूद्ध लढले, त्या कथेला देखील दाखवते. शूरवीरांपैकी एकाच्या भूमिकेत दिसण्यात येणाऱया आकाश ठोसरने नुकतेच सांगितले की, त्याचे लष्करामध्ये जाण्याचे बालपणापासून स्वप्न होते. तो म्हणाला, बालपणापासून माझे भारतीय सेनेमध्ये जाण्याचे स्वप्न होते आणि मी चित्रपटसफष्टीमध्ये येण्घ्यापूर्वी लष्करामध्ये निवड होण्यासाठी दोनदा परीक्षा देखील दिली होती. फक्त सैन्य अधिकारीच नव्हे तर मी पोलिस सेवेमध्ये देखील दाखल होण्याचा प्रयत्न केला. मी अभिनेता नसतो तर निश्चितच आपल्घ्या देशाच्या संरक्षणासाठी माझे करिअर सैन्यामध्ये असते. तो पुढे म्हणाला, पहिल्यांदाच मला सैनिकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. माझी छाती आनंद व अभिमानाने भरून आली. मला वास्तविक जीवनात मिळाली नाही तरी रील जीवनामध्ये सैन्याचा पोशाख परिधान करण्घ्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला. मला अत्यंत खास वाटले. असे वाटले की, मी सैन्याचाच भाग आहे आणि मी स्वतःकडे त्याच दृष्टिने पाहिन. आकाश ठोसर किशनची भूमिका साकारेल, जो मेजर सुरज सिंग (अभय देओल) नेतफत्वित बटालियनचा भाग आहे. ही सीरीज 26 फेब्वारी 2021 रोजी फक्त डिस्ऩे हॉटस्टार व्हीआयपी आणि डिस्ऩे हॉटस्टार प्रिमिअमवर प्रदर्शित होणार आहे.