दिगंबर कामतसह सर्व संबंधितांची दक्षता खात्यामार्फत चौकशी करावी
प्रतिनिधी/ पणजी
आके मडगाव शेतजमिनीला पुढे खुली जागा म्हणून मडगावच्या बाहय़ विकास आराखडय़ात शिक्कामोर्तब केलेले आहे. त्या ठिकाणी सर्व नियम डावलून त्यातून मोठा व्यावसायिक प्रकल्प उभारण्यात आलेला आहे व या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याची शक्यता व्यक्त करून भाजपचे मडगाव मंडळाच्या अधिकाऱयांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, पीडीएचे अशोक कुमार, नियोजनाचे पॉल गोम्स व मडगावचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक या सर्वांची दक्षता खात्यामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी एका पत्रकार परिषदेत केली.
भाजप मडगाव मंडळाचे सरचिटणीस नवीन पै रायकर, प्रवक्ता शर्मद रायतूरकर व सदस्य शिरिष कामत यांनी पणजीत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित एक पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली व त्याचबरोबर पत्रकारांसमोर काही कागदपत्रेही आके मडगाव येथील एक जमिन 24 जाने. 2007 मध्ये दक्षिण गोवा पीडीएच्या सदस्य सचिवांनी ओलित क्षेत्र म्हणून सर्वेक्षणात निश्चित केले. ही जमिन खुली जागा म्हणून जाहीर झालेली असताना देखील परेश शहा नावाच्या एका व्यक्तीने 29 मार्च 2003 मध्ये खरेदी केली. 2007 चा मडगावच्या बाहय़ विकास आराखडय़ात ही जमिन खुले व विविद्योपयोगी सार्वजनिक हितासाठी राखीव असल्याचे जाहीर करण्यात आले. मडगावच्या या बाहय़ विकास आराखडय़ावर तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी स्वत:स्वाक्षरी देऊन मान्यता दिलेली होती. कालांतराने परेश शहा यांचे झोनमध्ये बदल करण्याची मागणी दक्षिण गोवा विकास प्राधिकरणाकडे केली हा प्रस्ताव सदस्य सचिवांनी फेटाळला.
त्यानंतर एका प्रॉक्सीने परत एकदा झोन बदलण्याची मागणी केली परंतु. ओपन स्पेश असल्याचे निमित्त राखवून 2011 ते 2016 या दरम्यान फेटाळण्यात आली. मडगाव ओडीपीचा अंतिम 2011 नुसार 2016 मध्ये प्रसिद्ध झाला ज्यामध्ये ही जमीन व्यावसायिक झोनमध्ये बदललेली दाखविली. वरिल 2011 मध्ये दिगंबर कामत हे मुख्यमंत्री होते. 2012 मध्ये जिल्हाधिकाऱयांनी या जमिनीच्या रुपांतरणासह सनद दिली. हाच एक मोठा घोटाळा होता त्यानंतर 2019 मध्ये सदर जागेत मॉल उभारण्यात आला व हा मॉल दिगंबर कामत यांचे चिरंजीव तसेच त्यांचे मेहुणे उमाकांत लवंदे यांनी खरेदी केल्याची माहिती नवीन रायकर यांनी दिली. ज्या जमिनीचे रुपांतर फेटाळण्यात आले होते, जी जमीन ओलित क्षेत्रात येते, जी जमीन खुली जागा म्हणून जाहीर होते व विविध सामाजिक उद्योगासाठी रिक्रीएशनल जमीन म्हून राखीव असते त्याजागी मोठा भव्य मॉल कसा उभारला जातो? असा प्रश्न उपस्थित करून शर्मद रायतूरकर, नवीन पै रायकर व गिरीश कामत या तिघांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर बोट ठेवले.
तिघांनीही केली की या संपूर्ण प्रकल्पाची दक्षता खात्यामार्फत चवकशी व्हावी दिगंबर कामत, अशोक कुमार, पॉल गोमीश व सिद्धीविनायक नाईक या सर्वांची दक्षता खात्यामार्फत चौकशी करून त्याच्याविरुद्ध कारवाई करावी असे त्यांनी सरकारला सूचित केले.