आचरा / प्रतिनिधी-
गेले दोन दिवस सोसाट्याच्या वारयांसह मुसळधार कोसळणारया पावसाने आचरा परीसराला चांगलेच झोडपले आहे. सोमवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास आचरा हिर्लेवाडी अशोक मुरलीधर मुणगेकर यांच्या घरावर भलेमोठे रतांबीचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. यात घराच्या पडवीच्या पत्र्यांचे नुकसान झाले असून लगतच्या विद्युत वाहिन्यांवरही हे झाड कोसळल्याने वीज वितरणचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रणया टेमकर उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, यांनी दाखल होत पाहणी केली