मेष: तडकाफडकी बोलणे व बेसुमार खर्च यावर नियंत्रण ठेवा.
वृषभः व्यसन आणि प्रेम प्रकरण यात गुंतण्याची शक्यता, सावध राहा.
मिथुन: कुलदीपक योग, काहीतरी महत्त्वाचं काम करून दाखवाल.
कर्क: एखादे काम होण्यासाठी नीतीबाह्य वर्तन घडण्याची शक्यता.
सिंह: कौटुंबिक भांडणाचा तमाशा होणार नाही याकडे लक्ष द्या.
कन्या: अपघात, दुर्घटना, विषारी पदार्थ यापासून जपावे.
तुळ: गेलेली नोकरी परत मिळण्याची शक्यता पण तुमचेही प्रयत्न हवेत.
वृश्चिक: तारणाशिवाय कुणालाही उसने पैसे देऊ नका.
धनु: जागा, घर, जमीन वगैरे घेण्यास अनुकूल काळ.
मकर: प्रवास जपून करावेत, घातकी कामापासून दूर राहा.
कुंभ: स्पष्टवक्तेपणा नडेल, स्वतःची काळजी घ्या.
मीन: अनिष्ट विचारांना थारा देऊ नका, इतरांनाही समजून घ्या.