मेषः नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल त्याचा फायदा करून घ्या
वृषभः संपत्ती दर्जा वाढेल थोरामोठय़ांच्या सहकार्याने भाग्योदय
मिथुनः काही जणांचे ऐकून सर्वसंगपरित्याग करण्याची बुद्धी होईल
कर्कः कार्यकुशल, प्रयत्नांमुळे इतरांना अवघड वाटणारी कामे करून दाखवाल
सिंहः राजकारण समाजकारण व नोकरी-व्यवसाय यात उत्तम यश मिळेल
कन्याः तीर्थयात्रा प्रवासाचे योग काही काही कारणाने रद्द होतील
तुळः संकटे व चिंता यांना आमंत्रण देणाऱया गोष्टीच्या मागे लागू नका
वृश्चिकः विज्ञानाचा प्रयोग करताना काही नवीन शोध लागतील
धनुः आर्थिक बाबतीत उत्तम पण आरोग्याच्या बाबतीत जरा त्रासदायक.
मकरः पाण्यापासून सावधगिरी बाळगा, अनावश्यक ठिकाणी प्रवास टाळा
कुंभः बाहेर जाताना सावधगिरी बाळगा, चोरीची शक्यता नाकारता येत नाही
मीनः अनाहुत पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागेल.