मेष: व्यवसायाला कलाटणी देणाऱया घटना घडतील.
वृषभः मातापित्यांच्या सल्ल्याने वागल्यास महत्त्वाची कामे होतील.
मिथुन: तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला जाईल.
कर्क: घरासंदर्भातील सर्व व्यवहार तूर्तास पुढे ढकलावेत.
सिंह: नव्या व्यवसायासाठी द्वारे खुली असतील पण गडबड करू नये.
कन्या: काम कितीही अवघड असले तरी बोलणे मधुर ठेवा.
तुळ: कोणतेही कार्य करताना लॉकडाऊनचा विचार जरुर करा.
वृश्चिक: हटवादीपणा व चुकीचे धोरण बदलावे लागतील.
धनु: कमी किंमतीत वाहन मिळाल्याने हुरळून जाऊ नका.
मकर: विविध कलाक्षेत्राशी संबंध येईल, मनासारखे यश मिळेल.
कुंभ: आयात-निर्यात इत्यादी क्षेत्रात यश मिळवाल.
मीन: चेहऱयावरील भाव ओळखा, अनेक गोष्टी समजतील.