मेष: हल्ले, मारामाऱया, दरोडा, अग्निभय यापासून जपा.
वृषभः मातापित्यांचा सल्ला धुडकावल्याने नुकसान होईल.
मिथुन: मालकाशी शत्रूत्व व त्यामुळे नोकरीत त्रास.
कर्क: मोठय़ा प्रमाणात धनलाभ होण्याची शक्यता.
सिंह: संतती प्राप्तीचे योग, शासकीय मानसन्मान लाभेल.
कन्या: नवी वास्तू बांधण्यास प्रारंभ कराल.
तुळ: गेलेले सर्व वैभव परत मिळण्याची शक्यता.
वृश्चिक: मित्रमंडळींकडून, थोरामोठय़ांकडून कामे होतील.
धनु: अन्नदानासारखी पुण्यकर्मे तुमच्या हातून घडतील.
मकर: व्यावसायिक कार्ये व त्यातून तुमचा फायदा होईल.
कुंभ: घर असल्यास दुरुस्ती, डागडुजीसाठी खर्च कराल.
मीन: लग्न, मुंज या कार्यात यश मिळेल.