पंतप्रधानासह अमित शहा, राजनाथ, नड्डा, गडकरींच्या सभा
प्रतिनिधी /पणजी
विधानसभा निवडणूक आता केवळ सात दिवसांवर आली असून प्रचारासाठी केवळ पाच दिवस राहिले आहेत. आजपासून भाजपचे स्टार प्रचारक गोव्यात दाखल होणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी सांगितले. स्टार प्रचारकांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंग, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश असणार आहे.
काल सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदानंद तानावडे बोलत होत.s यावेळी त्यांच्या सोबत सहप्रभारी किशन रेड्डी उपस्थित होते.
जाहीरनामा प्रकाशन आज
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे गेल्या दोन दिवसांचे सर्व जाहीर कार्यक्रम आम्ही रद्द केले तर काही कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले. यातील एक महत्वाचे कार्यक्रम म्हणजे भाजपाच वचननामा प्रकाशन, वास्तविक हा कार्यक्रम रविवारी होणार होता. हा कार्यक्रम आज मंगळवार दि. 8 रोजी दुपारी 12.30 वाजता हॉटेल मॅरियॉट येथे होणार आहे. या कार्यक्रमाला नितीन गडकरी उपस्थित रहाणार आहेत, असेही तानावडे म्हणाले.
नितीन गडकरींच्या सभा
संध्याकाळी पाच वाजता पेडणे येथील बसस्थानकावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. संध्याकाळी सात वाजता शिवोली येथे होणाऱया जाहीर सभेत नितीन गडकरी उपस्थित रहातील.
जे. पी. नड्डा यांच्याही दोन सभा
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही आज दुपारपर्यंत गोव्यात दाखल होणार असून फातोर्डा आणि नावेली येथे होणाऱया जाहीर सभेत ते सहभागी होतील. उत्तर गोव्यात दोन आणि दक्षिण गोव्यात दोन एकूण चार जाहीर सभा होतील, असेही तानावडे यांनी सांगितले.
राजनाथसिंह फोंडा, वास्कोत सभा
बुधवार दि. 9 रोजी केंद्रीयमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंग गोव्यात येणार असून राजनाथ सिंग हे सकाळी गोव्यात येणार असून सुरुवातीला ते म्हार्देळ येथील म्हालसा देवीचे दर्शन घेतील, संध्याकाळी पाच वाजता फोंडा येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. तसेच साडेसात वाजता वास्को येथे होणाऱया जाहीर सभेतही ते सहभागी होतील.
डिचोली, सांखळीत अमित शहा
अमित शहा दुपारी गोव्यात पोचणार असून संध्याकाळी साडेपाच वाजता डिचोली येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर साडेसात वाजता साखळी येथे होणाऱया जाहीरसभेत अमित शहा सहभागी होतील.
पंतप्रधानांची 10 रोजी म्हापशात सभा
गुरुवार दि. 10 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येत असून प्रचाराची शेवटची जाहीर सभा म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिरा समोर होणार आहे. संपूर्ण उत्तर गोव्यातील कार्यकर्ते या सभेत सहभागी होणार आहेत, असेही तानावडे म्हणाले.
दरम्यान गुरुवार 10 रोजी निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस तसेच गोवा सहप्रभारी किशन रेड्डी हे विविध ठिकाणी होणाऱया कोपरा बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. याशिवाय उमेदवारांचा घरोघरी प्रचार सुरु असून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येत्या निवडणूकीत भाजप स्वबळावर पुन्हा एकदा बाजी मारणार यात शंकाच नाही. असेही तानावडे यांनी सांगितले.
मगो-टिएमसी युती म्हणजे मुंगेरीलाल के सपने
टीएमसी आणि मगो युती सत्तेत येणार असा विश्वास टीएमसीने व्यक्त केला आहे याबाबत तानावडे यांना विचारले असता ते म्हणाले की मुंगेरीलाल के हसीन सपने असाच त्यांचा विश्वास आहे.
काँग्रेसचा सुपडा साफ होणार
काँग्रेसने प्रकाशित केलेला जाहीरनामा हा 2035 पर्यंतचे ध्येय असे म्हटले आहे, त्याबाबत तानावडे यांना विचारले असता ते म्हणाले की येत्या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साप होणार हे त्यांना माहित आहे. कदाचीत 2035 सालात निवडणूका झाल्या तर त्यांना निवडन येण्याची आशा वाटत असेल त्यामुळे त्यांनी 2035 सालातील ध्येय जनते समोर ठेवले आहे. आमचा जाहीर आज प्रकाशीत होणार असून आम्ही पुढील पाच वर्षात काय करणार ते जनते समोर मांडले आहे. आमचा जाहीरनामा हा जाहीरनामा नसून वचननामा आहे असेही तानावडे म्हणाले.