प्रतिनिधी / आजरा
आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण आज जाहीर झाली. तहसिलदार विकास अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. व्यंकटराव हायस्कूलचे विद्यार्थी आदित्य शेलार व वेदांत म्हसवेकर यांच्या हस्ते ही आरक्षण सोडत काढण्यात आली.
सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे :-
अनुसुचित जाती – बेलेवाडी हुI।, चिमणे, गजरगांव, सुळेरान
अनुसुचित महिला प्रवर्ग – सरंबळवाडी, धामणे, इटे, वडकशिवाले
नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला) – सोहाळे, वझरे, कासार कांडगाव, चव्हाणवाडी, किणे, जाधेवाडी, मलिग्रे, पोळगांव, बुरुडे, हात्तिवडे
नागरीकांचा मागास प्रवर्ग – चाफवडे, उत्तूर, सिरसंगी, शेळप, हालेवाडी, झुलपेवाडी, लाटगांव, मसोली, आवंडी, कोरीवडे
सर्वसाधारण – मुरुडे, हाजगोळी खु॥, दाभिल, देवकांडगांव, देवर्डे, वेळवट्टी, साळगांव, हरपवडे, कोवाडे, वाटंगी, श्रृंगारवाडी, सरोळी, कर्पेवाडी, मासेवाडी, मेंढोली, सुलगांव, भादवणवाडी, खेडे, कितवडे, मडिलगे, निंगुडगे, पेद्रेवाडी
सर्वसाधारण (महिला) – चांदेवाडी, एरंडोळ, गवसे, कानोली, लाकूडवाडी, सुळे, खोराटवाडी, होन्याळी, पारपोली, आर्दाळ, हाजगोळी बु॥, भादवण, बहिरेवाडी, खानापूर, पेंढारवाडी, हाळोली, चितळे, महागोंड, कोळिंद्रे, देऊळवाडी, पेरणोली, होनेवाडी, मुमेवाडी