प्रतिनिधी / आजरा
आजरा -आंबोली मार्गावर मसोली फाटयाजवळील वळणावर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. कलिम इस्माईल बेग ( वय ५०) असे अपघातातील मृताचे नाव असून ते मूळचे समतानगर जळगाव येथील आहेत. आज दुपारी तीनच्या सुमारास बॉयलर पक्षी वाहतूक करणाऱ्या गाडीने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला.
मुळचे जळगावातील असणारे कलिम बेग हे सध्या आजऱ्यातील आझाद कॉलनीत वास्तव्यास होते. मसोली फाट्याजवळील वळणावर झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.