बेळगाव, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक, मुडलगी तालुक्यांचा समावेश
प्रतिनिधी/ बेळगाव
राजकारणाची पहिली पायरी म्हणून ग्राम पंचायतीकडे पाहिले जाते. या ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली असून मंगळवार दि. 22 रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7 पासून सायंकाळी 5 पर्यंत हे मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोगाने तयारी केली असून आज मंगळवारी पहिल्या टप्प्यातील 259 ग्राम पंचायतींसाठी मतदान होत आहे.
प्रत्येक तालुक्मयामधील ग्राम पंचायतींच्या अखत्यारितच हे मतदान होत आहे. सरकारी शाळा, सरकारी इमारती, खासगी शाळा या ठिकाणी हे मतदान घेण्यात येत आहे. यासाठी निवडणूक कर्मचाऱयांबरोबरच पोलीस बंदोबस्तही ठेवण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हय़ातील निवडणूक दोन टप्प्यात होत असून दुसऱया टप्प्यातील निवडणूक 27 डिसेंबर रोजी होत आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये बेळगाव, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक, मुडलगी या सात तालुक्मयातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका होत आहे. एकूण 259 ग्राम पंचायतींच्या 4 हजार 259 सदस्य संख्येसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण 13 लाख 2 हजार 25 मतदार आहेत. यामध्ये 6 लाख 59 हजार 159 पुरूष मतदार आहेत तर 6 लाख 42 हजार 866 महिला मतदार आहेत. ग्राम पंचायतीची निवडणूक ही स्थानिक पातळीवर होत असल्यामुळे या मतदानाची टक्केवारी नेहमीच वाढत असते. यावषीही मतदान टक्केवारी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
तरुणांचा अधिक भरणा
या निवडणुकीसाठी स्थानिक विविध आघाडय़ा करुन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तरुणांचा अधिक भरणा असून मोठी चुरस निर्माण झाली आहे. म. ए. समितीचे नेहमीच वर्चस्व आहे. यावषीही म. ए. समितीच बाजी मारणार, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून 1779 मतदान केंदे आहेत. त्यामधील 234 मतदान केंद्रे हे संवेदनशील आहेत.
निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त
या निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. एक पोलीस प्रमुख, एक अतिरिक्त पोलीस प्रमुख, सात पोलीस उपअधिक्षक, 13 मंडल पोलीस निरीक्षक, 64 पोलीस उपनिरीक्षक, 132 साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, 2 हजार 710 हवालदार व पोलीस, 555 होमगार्ड असा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. याचबरोबर सशस्त्र दलाच्या 18 व राज्य राखीव दलाच्या सहा तुकडय़ा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
या निवडणुकीसाठी प्रत्येक केंद्रावर एक निवडणूक अधिकारी तसेच वॉर्डनिहाय पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. एकूणच या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून सकाळी 7 पासून मतदान होणार आहे.