आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील 56 ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार दिनांक 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. आटपाडी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आरक्षणाची सोडत होणार आहे. या आरक्षण सोडतीसाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.
सध्या तालुक्यातील दहा ग्रामपंचायतच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्याच्या सरपंच पदाचे ही आरक्षण या सोडतीमध्ये निश्चित होणार आहे.