अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 25 मार्च 2022, सायंकाळी 11.30
● कराडला 6 रूग्णांची भर
● 24 तासात 697 संशयितांच्या चाचण्या
● पॉझिटिव्हीटी रेट 1.15
सातारा / प्रतिनिधी :
गुरूवारी आलेल्या अहवालात जिल्ह्यात एकही रूग्ण आढळून आला नव्हता. 637 संशयितांच्या चाचण्या झाल्या असताना सर्वच तालुके शुन्यावर होते. मात्र, शुक्रवारी आलेल्या अहवालात कराडला 6 रूग्णांची वाढ झाली असून फलटण, कोरेगाव तालुक्यात प्रत्येकी 1 रूग्ण आढळला आहे. गेल्या 24 तासात 697 संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
12 ते 15 वयोगटात लसीकरणाचा उत्साह
जिल्ह्यात सध्या 12 ते 15 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची विशेष मोहिम सुरू आहे. या मोहिमेला सातारा, कराड, फलटण, कोरेगांव, माणसह इतर तालुक्यात प्रतिसाद मिळत आहे. या गटातील लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक शाळेत योग्य ते नियोजन केले आहे. पालकांनीही लसीकरणासाठी मुला मुलींना प्रेरित करण्याची गरज आहे.
सर्दी, खोकल्याचे आजार
वातावरणातील अचानक बदल आणि अवेळी पडत असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात सर्दी आणि खोकल्याचे रूग्ण कमी अधिक प्रमाणात वाढत आहेत. फॅमिली डॉक्टरांसह लहान मुलांच्या रूग्णालयात या आजारांच्या तपासणीसाठी रूग्ण येत आहेत. मात्र हा वातावरणातील फरक असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.
शुक्रवारी
नमुने-697
बाधित-8
मृत्यू-00
शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात
नमुने-25,67,953
बाधित-2,79,180
मृत्यू-6683
मुक्त-271760