तालुका पंचायत सदस्य शरद गुर्जर यांची मागणी
प्रतिनिधी / जोयडा
रामनगर येथील पश्चिम दिशेला असलेला आडाळी भाग स्टोन क्वॉरीसाठी स्पेशन झोन होता तो रद्द करा, स्टोन ब्लास्टिंगमुळे रामनगरातील घरांना भेगा पडल्या असून शेतकऱयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर योग्य तोडगा काढावा, आशा मागणीचे निवेदन ता. पं. सदस्य शरद गुर्जर यांनी राज्य जीववैविध्य मंडळ व पर्यावरण आणि जीवशास्त्र विभागाचे राज्याध्यक्ष आनंद हेगडे आरशीसर यांना सादर केले.
10 वर्षांपासून अडाळी भागात 8 ते 10 स्टोन क्वॉरी सुरू झाल्या आहेत. येथील बेकायदेशीर ब्लास्टिंगमुळे या भागातील 1 हजार एकर प्रदेशातील उत्पदनावर परिणाम होत आहे. ब्लास्टिंगमुळे दगड शेतात येऊन पडत असल्यामुळे शेतकऱयांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. याबाबत तालुका प्रशासन व रामनगर ग्रा. पं. यांच्याकडेही तक्रार केली आहे.
पण अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत.
नुकताच 500 शेतकऱयांच्या सहीसह जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे. तालुका पंचायतच्या केडीपी सभेत सर्वानुमते ठराव संमत करून स्टोन कॉरी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टोन कॉरी वन्य प्रदेशाला लागून असल्यामुळे याचा परिणाम जीव वैविधतेवर होत आहे. तसेच स्टोन कॉरीमुळे रामनगरातील सामान्य जनतेवर विपरित परिणाम होत असून आरोग्य बिघडत आहे. हा उद्योग सामान्य जनतेच्या जीवावर उलटलेला आहे. यामुळे स्टोन कॉरी बंद करावी अशी मागणी शरद गुर्जर यांनी केली आहे.