‘तरुण भारत’च्या वृत्ताची प्रशासनाकडून दखल : शवागरामध्येही ‘मोक्मर्युरी केबीन’
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाने मृत्यू होणाऱया रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्राधिकरणमधील स्मशानभूमीत आणखी एक स्मशानशेड तात्काळ उभारण्यात येत आहे. विद्युत दाहिनी उभारण्याची सुद्धा कार्यवाही सुरू करण्यात आली आहे मृतांच्या नातेवाईकांच्या अडचणी सोडवण्यासाठी समन्वयक अधिकारी नेमण्यात आला आहे. तसेच शवागरामध्ये मृतदेह ठेवण्यास जागा कमी पडत असल्याने जागा वाढविण्यासाठी जिल्हा नियोजनमधून ‘मोक्मर्युरी केबिन’ बसवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
कोरोनाने मृत्यू होणाऱया रुग्णांची संख्या वाढत असल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह वेटिंगवर ठेवावे लागत असल्याचे तसेच शवागरांमध्येही जागा नसल्याचे वृत्त ‘तरुण भारत’मधून प्रसिद्ध होताच जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी तात्काळ अतिरिक्त स्मशानशेड व शवागराच्या जागेची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करणारे नागेश ओरोसकर व प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी यांना बोलावून घेत प्राधिकरणमधील स्मशानभूमीत तात्काळ स्मशानशेड व स्मशान स्टॅण्ड उभारण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे आहेत स्मशान स्टॅण्ड उभारण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात आली आहे. तसेच प्राधिकरणच्या निधीतून विद्युत दाहिनी उभारण्याचा प्रस्तावही तयार करण्यात येत आहे. सुमारे 15 लाख रुपये खर्च करून ही विद्युत दाहिनी उभारली जाणार आहे.
नातेवाईकांच्या मदतीसाठी समन्वयक
प्राधिकरणमधील स्मशानशेडमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागेश ओरोसकर यांना कंत्राटदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अंत्यसंस्काराची सेवा विनामूल्य ठेवली आहे. याबाबत काही अडचण असल्यास सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण, सिंधुदुर्गनगरी या शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संजय यादव, समन्वय अधिकारी (9689024864), ऋषिकेश पानगले, लिपीक, सहा. समन्वय अधिकारी (9623997756), तर नागेश आरोसकर, ठेकेदार (9405631701) या प्रमाणे नियुक्ती करण्यात आली असल्याचे मंगेश जोशी यांनी सांगितले.
प्राधिकरणमध्ये अंत्यसंस्कार करण्यास परवानगी- आमदार वैभव नाईक
जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णावर विनामूल्य प्राधिकरणच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्याप्रमाणे तालुक्मयाच्या ठिकाणी कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मृतदेहावर प्राधिकरणच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन केली. या मागणीला जिल्हाधिकाऱयांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे तालुक्मयात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची अडचण आता राहणार नाही.
शवागरामध्येही आता वेटिंग करावे लागणार नाही!
तसेच शवागरामध्येही बारा मृतदेह ठेवता येतील, अशी मोक्मर्युरी केबिन होण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हाधिकाऱयांकडे तातडीने प्रस्ताव पाठवला आहे. सुमारे 22 लाखाच्या प्रस्तावाला जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिला जाणार असून हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.