कोरोना सक्रिय रुग्ण संख्या 58 : संशयित 28 रुग्ण आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ातील आणखी सात रुग्ण बरे झाल्याने त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 179 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत 58 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच 28 संशयित रुग्ण आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल आहेत, तर दोन कंटेनमेंट झोन वाढल्याने सध्या 30 ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात आतापर्यंत एकूण 243 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यातील 179 रुग्ण बरे झाले, तर पाचजणांचा मृत्यू झाला, एक रुग्ण मुंबईला गेला. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह 58 रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
जिल्हय़ात आतापर्यंत एकूण 114 कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले होते. मात्र रुग्ण जस-जसे बरे होऊ लागले व नव्याने रुग्ण आढळले नाहीत, असे 84 कंटेनमेंट झोन शिथिल करण्यात आले आहेत. तर 30 कंटेनमेंट झोन अजूनही लागू आहेत. त्यामध्ये देवगड तालुक्मयात तीन, कणकवली तालुक्यात 20, वैभववाडी तालुक्यात दोन, मालवण तालुक्यात तीन आणि कुडाळ तालुक्मयात दोन कंटेनमेंट झोन आहेत.
खारेपाटण व आचरा (पिरावाडी) येथे कंटेनमेंट झोन
कणकवली तालुक्मयातील खारेपाटण-कोष्टीवाडी येथील एक कि. मी. परिसरातील 249 घरे, 292 कुटंबे, 1 हजार 161 लोकसंख्या असणारा सर्व परिसर तसेच मालवण तालुक्मयातील आचरा-पिरावाडीच्या 300 मीटर परिसरामध्ये कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर दोन्ही तालुक्यांमधील कंटेनमेंट झोनमध्ये 18 जुलै 2020 रोजी रात्री 12 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱयाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवली व कुडाळच्या उपविभागीय अधिकाऱयांनी दिले आहेत.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 4157
अहवाल प्राप्त झालेले नमुने 4104
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 243
निगेटिव्ह आलेले नमुने 3861
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 53
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 58
अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 1
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 179
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 86
सोमवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 1229
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 15441
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 31
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12915
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 2495
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 122817