82 जणांना डिस्चार्ज, 1 हजार 998 जण कोरोना मुक्त : सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 99
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून मंगळवारी आणखी 80 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बरे झालेल्या 82 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
गेल्या चार-पाच दिवसांत कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण थोडे कमी झाले होते, ते आता वाढू लागले आहे. सोमवारी 48 पॉझिटिव्ह, तर मंगळवारी 80 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधित एकूण रुग्ण संख्या 3 हजार 165 झाली आहे. तसेच बरे झालेल्या आणखी 82 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 1 हजार 998 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कणकवली तालुक्मयातील घोणसरी येथील दीपक कारेकर (वय 35), वेंगुर्ले तालुक्मयातील रेडी येथील जयदेव कृष्णाजी (वय 70), संदीप केरकर (वय 36) आणि कुडाळ केशव भिसे (वय 65) या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 68 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 1 हजार 99 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 23205
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 3165
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 19455
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 585
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 1099
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 68
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 1998
गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 8055
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12808