कोरोना महामारीचा प्रादुर्भाव
दीपक बुवा / बेळगाव
कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशाला हादरुन सोडले आहे. तरीदेखील अजूनही कोरोना संसर्ग आटोक्मयात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे काही खासगी हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल याचबरोबर इतर स्थानिक संस्थांमध्ये कोरोना रुग्ण ठेवण्यात येत आहेत. परिणामी याचा फटका इतर सर्वसामान्यांना बसत आहे. महत्त्वाचे म्हणजे वयोवृद्धांना याचा अधिक फटका बसत असल्याने आता जिल्हा प्रशासनाने ग्राम पंचायतींमध्ये वृद्धांसाठी नवीन सेवा सुरू केली असून त्यांच्या आरोग्याची तपासणी ग्राम पंचायतींमध्ये करण्यात येणार आहे. याचे उद्घाटन देखील झाले आहे.
आशा कार्यकर्त्यांना याबाबचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर अजूनही याबाबत काहींना प्रशिक्षण देण्यासाठी हालचली गतिमान झाल्या आहेत. बेळगाव तालुक्मयात बस्तवाड येथे या कार्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. ग्राम पंचायतींमध्ये 60 वर्षांहून अधिक वृद्धांना आता रक्तदाब, मधूमेह याचबरोबर इतर कोणतेही आजार असल्यास त्यांची तपासणी करून औषध देण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे आता कोणत्याही वृद्धांना त्रास होणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
याआधीही काही आशा कार्यकर्त्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बेळगाव तालुक्मयातील अनेक खासगी दवाखाने कोविड केंद्रासाठी राखीव ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक वृद्धांना उपचार मिळणे कठीण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याच अनुषंगाने आता त्यांच्या सोयीसाठी ग्राम पंचायतमध्ये मिनी दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये अशा पद्धतीने वृद्धांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासाही मिळाला आहे.
आरोग्य तपासणीसाठी लागणारी यंत्रे ग्राम पंचायतीने स्वतः खर्च करून आणावयाची आहेत. साधरणत: 10 ते 15 हजार रुपये या यंत्रे खरेदीसाठी खर्च करण्याची तरतूद जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. व्ही. राजेंद्र यांनी केली आहे. त्यासंबंधिच्या सूचनाही ग्राम पंचायतींना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता प्रत्येक ग्राम पंचायतमध्ये रक्तदाब, मधूमेह व थर्मल स्किनिंग मशिन उपलब्ध करून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव तालुक्मयातील सर्व ग्राम पंचायतींमध्ये आता ही सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कामाला सुरुवात करावी, असे आवाहन डॉ. के. व्ही. राजेंद्र यांनी केले आहे.
प्रत्येक ग्राम पंचायतमध्ये 2 ते 4 आशा कार्यकर्त्यां असणार आहेत. जे वयोवृद्ध येतील त्यांच्या आरोग्याबाबत संबंधित तपासणी करणार आहेत व साधकबाधत आजार असल्यास त्यांच्यावर औषधेही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यापुढे दररोज ग्राम पंचायतींमध्ये अशाप्रकारे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात दिलासा मिळाला असून याबाबत एखादा डॉक्टरही राहिल्यास सोयीचे ठरणार आहे.
ता.पं.कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी
बेळगाव तालुक्मयातील सर्व 59 ग्राम पंचायतींमध्ये वयोवृद्धांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात आता इतर हॉस्पिटलवरील ताण कमी होणार आहे. हा संकल्प योग्यपद्धतीने राबविण्यासाठी आम्ही सज्ज असून त्यासाठीच्या सर्व सूचना ग्राम पंचायतींना करण्यात आल्या आहेत. हा उपक्रम आता सातत्याने सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे..