ऑनलाईन टीम / नवी मुंबई
वाहन खरेदी केल्यानंतर या ना त्या कारणाने वाहन खरेदीदाराला आरटीओ कार्यालयात फेऱ्यामाराव्या लागत होत्या यापैकी वाहन नोंदणीसाठी ही आरटीओ कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. यातुन आता वाहन नोंदणी धारकांची सुटका होणार आहे. कारण वाहन खरेदीनंतर करण्यात येणारी वाहन नोंदणी आता घरबसल्या करता येणार आहे. त्यामुळे आरटीओतील पायपीट थांबणार आहे. या संदर्भातील सुचना परिवहन खात्याने एनआयसीला दिल्या आहेत.
कोणतीही गाडी खरेदी केल्यानंतर नोंदणीसाठी (Vehicle registration) RTO कार्यालयात हेलपाटे घालावे लागत होते. पण शासनाच्या नव्या नियमानुसार घरबसल्या गाडीची नोंदणी करण्याची सोय झाली असून नवे आरसीबुक घरपोच मिळणार आहे. वाहन खरेदीनंतर ऑनलाईन पद्धतीने वाहनाची नोंदणी आरटीओ (RTO) च्या संकेतस्थळावर करु शकता. तशी सुविधा आरटीओने उपलब्ध करुन देण्यासाठी आपल्या संकेतस्थळावर योग्य ते बदल करण्याच्या सुचना परिवहन खात्याने एनआयसीला दिल्या आहेत .
याबरोबर जुन्या दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीनंतरची नोंदणीही ऑनलाईन पद्धतीने करणे शक्य झाले आहे. (Maharashtra’s vehicle registration process online) तसेच घरबसल्या नवे आरसीबुक मिळणार आहे. गाडी ज्या ठिकाणी खरेदी केली त्या शोरुममधुनच ही सेवा मिळणार आहे. यात जुन्या चारचाकी, दुचाकी गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सुविधेमुळे ऑनलाईन लर्निंग लायसन्सच्या धर्तीवर जुन्यावाहन खरेदीची नोंदणी करता येणार आहे. तसेच सर्वसामान्यांची आरटीओ कार्यालयात होणारी गैरसोय थांबणार असून. यामुळे आरटीओ कार्यालयातील एजंट आणि दलाल यांना पायबंद बसणार आहे.