वॉशिंग्टन
चीनची व्हिडीओ शेअरिंग ऍप कंपनी बाईटडांसला अमेरिकेची सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकल विकत घेणार आहे. यासंबंधीच्या कराराला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर या कराराचा वॉलमार्टही एक भाग असेल अशी माहितीही ट्रम्प यांनी दिली. या निर्णयानुसार या कंपनीचे कार्यालय टेक्सासमध्ये असणार असून टिक-टॉकची मालकी अमेरिकेकडे येणार आहे. टिकटॉक या ऍपचा जगभर वापर केला जातो आणि त्या माध्यमातून या कंपन्यांची हजारो कोटींची कमाई होत असल्याचा दावा मध्यंतरी करण्यात आला होता. या कंपन्या वापरकर्त्यांचा डेटा चोरतात असा त्यांच्यावर आरोप असल्यामुळेच भारतातही त्यावर बंदी घालण्यात आली आहे.