बागायत खात्याची योजना : अनुदान मंजूर, राष्ट्रीय बागायत मिशन योजनेंतर्गत उपक्रम
बेळगाव / प्रतिनिधी
शहर व ग्रामीण भागातील फळे व भाजीपाला विक्रेत्यांचा दर्जा उंचावावा व मालाला सुरक्षितता मिळावी यासाठी बागायत खात्यामार्फत लहान फळ-भाजीपाला विक्रेत्यांना फिरती हातगाडी देण्यात येणार आहे. राष्ट्रीय बागायत मिशन योजनेंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. खरेदी करणाऱया विक्रेत्यांना अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. वाढत्या महागाईत शहरात भाडय़ाने गाळा घेऊन व्यवसाय थाटणे लहान विक्रेत्यांना न परवडणारे आहे. अशा विपेत्यांना बागायत खात्याची फिरती हातगाडी सोयीस्कर ठरणार आहे. बागायत खात्याने इच्छुकांना अर्जाचे आवाहन केले आहे.
शहर व ग्रामीण भागात रस्त्यावर फळे व भाजीपाल्याची विक्री केली जाते. विक्रीसाठी ठेवलेली फळे व भाजीपाला ऊन-पावसापासून सुरक्षित राहावा, शिवाय स्वच्छ राहावा, यासाठी बागायत खात्यामार्फत ही योजना राबविण्यात आली आहे. लहान फळे व भाजीपाला विक्रेत्यांनी या अभिनव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खात्याने केले आहे.
कोरोना काळात अनेकांच्या नोकऱया गेल्या, शिवाय बरेच उद्योग-व्यवसाय बंद झाले. त्यामुळे अनेक जण फळे व भाजीपाला विक्रीकडे वळलेले पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासाठी ही योजना लाभदायक ठरणार आहे. बाजारात सर्रास फळे व भाजीपाला विक्रेते जमिनीवर बसून व्यवसाय करतात. परिणामी विक्रीसाठी ठेवलेली फळे व भाजी खराब होण्याची शक्मयता असते. अशा विक्रेत्यांना सुरळीत विक्री करता यावी, यासाठी बागायत खात्यामार्फत सवलतीच्या दरात म्हणजे केवळ 15 हजार रुपयांत ही फिरती हातगाडी खरेदी करता येणार आहे. इच्छुक विक्रेत्यांनी आधार कार्ड, दोन छायाचित्रे व उद्योग लायसन्स झेरॉक्स प्रत आदी कागदपत्रांसह चन्नम्मा सर्कल येथील बागायत खात्याकडे अर्ज करावा. अधिक माहितीसाठी 9964295987 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे बायागत खात्याने कळविले आहे.
फिरून फळे-भाजीपाला विक्री करणाऱया लहान व्यावसायिकांना सुरळीत विक्री करता यावी या दृष्टिकोनातून ही हितकारी योजना राबविण्यात येत आहे. जिल्हय़ात 30 तर तालुक्यात 10 हून अधिक या फिरत्या हातगाडय़ा देण्यात येणार आहेत. या हातगाडय़ा 8 बाय 3 व 6 बाय 4 अशा दोन आकारांमध्ये उपलब्ध आहेत. फळमार्केट, भाजीमार्केट, एपीएमसी मार्केट यासह शहरात फिरून विक्री करणाऱया विपेत्यांना ही हातगाडी सोयीस्कर ठरणार आहे. या फिरत्या हात गाडीला चार चाके असल्याने ती एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी घेऊन जाता येते. या गाडीचे तीन दरवाजे खोलून व्यापार होऊ शकतो. त्यामुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणी ही हातगाडी थांबवून मालाची विक्री करणे सोयीस्कर होणार आहे.
प्रवीण महेंद्रकर (साहाय्यक संचालक, बागायत खाते)
रस्त्यावर फिरणाऱया फळ-भाजीपाला विपेत्यांची गरज ओळखून खात्याने ही योजना राबविली आहे. लहान विक्रत्यांनी या योजनेचा लाभ घेऊन सुरळीत फळे-भाजीपाला विक्री करावा. 30 हजार रुपये या फिरत्या हातगाडीची किंमत आहे. मात्र, त्यामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार असून ती 15 हजार रुपयापर्यंत दिली जाणार आहे. लहान फळ-भाजीपाला विपेत्यांनी हातगाडी खरेदी करून व्यवसाय वाढवावा.